Posts

Showing posts from March, 2023

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

राहुरी मार्केट कमिटी निवडणुक प्रोग्राम सर्व सामान्य उमेदवाराला घातक =सुरेशराव लांबे पाटील

Image
  राहुरी   ( प्रतिनिधी - शेख युनुस ) मार्केट कमिटी संचालक मंडळ निवडणुक सन २०२३-२८ या कालावधीसाठी होणारी निवडणुक प्रोग्राम चुकीचा असुन तो सर्वसामान्य उमेदवाराला घातक आहे यामंध्ये शेतकरी व सामान्य उमेदवार यांना या निवडणुकीतुन परावृत्त करण्याचा सरळ सरळ हेतु निवडणुक आयोग व प्रस्थापित पुढाऱ्यांसह सरकारचा आहे, विद्यमान सरकारने सर्व शेतकऱ्यांना मार्केट कमिटी निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क देण्यात येईल अशी वल्गना केली होती परंतु शेतकऱ्यांना निवडणुकीत निव्वळ उभा राहण्याचा अधिकार दिला त्यासाठी 5 हजार अनामत रक्कम,सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य हे सुचक अनुमोदक लागतील अशी अट घालुन शेतकऱ्यांना उभा राहण्याचा अधिकार देऊन प्रचार कालावधी अल्प करून शेतकऱ्यांची एक प्रकारे शासनाने थट्टाच केली,हा प्रश्न आम्ही माजी मंत्री आ बच्चुभाऊ यांच्याकडे मांडणार असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले सुरेशराव लांबे (प्रहार जनशक्ती तालुकाध्यक्ष राहुरी) राहुरी मार्केट कमिटी संचालक मंडळ निवडणुक सन-2023 ते 2028 या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुक प्रोग्राम खालील प्रमाणे, ...

चिखलठाण परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय साहित्याची चोरी

Image
  अहमदनगर प्रतिनिधीं / शेख युनुस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील म्हसकोबा वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडून चोरट्यांनी शाळेतील साहित्यांची चोरी करून पोबारा केला.                                           ‌    सविस्तर माहिती अशी कि म्हसकोबा वाडी येथे  इयत्ता 1 ते  4 पर्यंत शालेय विद्यार्थी हे वाडी वस्तीवरून येऊन शिक्षण घेतात. शाळेसाठी माजी मंत्री व आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या निधीतून कॅम्पूटर मोनीटर, माऊस,संपूर्ण सटसह साहित्य दिले होते,या कॉम्पुटर द्वारे येथील विद्यार्थी शालेय शिक्षणाची माहित घेत होते त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने  योग्य मार्गदर्शन होत होते. रविवार दि. 26 मार्च रोजी अज्ञात चोरट्यांनी शाळेतील संगणक साहित्य चोरून पोबारा केला .शिक्षक शाळेच्या वेळेनुसार शाळेत आले असता त्यांना शाळेच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडल्याचे लक्षात आले त्या अंदाजावर त्यांनी चोरी झाल्य...

पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांचा निरोप समारंभ संपन्न

Image
  पोलीस निरीक्षक घनश्याम  बळप यांचा निरोप समारंभ संपन्न पारनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांचा निरोप समारंभ चार मार्चला पारनेर तालुका पोलीस स्टेशन आणि पत्रकार बांधवांच्या आयोजकांच्या उपस्थित पार पडला अत्यंत हुशार व्यक्तिमत्व म्हणून पोलीस निरीक्षक यांची ओळख आहे, गेल्या दोन वर्षापासून त्यांनी पारनेर तालुका पोलीस स्टेशन येथे कारभार बघितला असून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून घनश्याम बळप यांच्याकडे पाहीले जात होते, तर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशान्वये  अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या  बदल्या करण्यात आल्या . पारनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व आवैद्य धंदे, तसेच दारू वाळू, चोर यांना चांगल्या प्रकारे घनश्याम बळप यांचा धाक होता. तर त्यांची बदली झाल्याने पारनेर तालुक्यातील  जनता भावनिक झाली होती. यापुढे देखील मी चांगलंच काम करणार असून, गोर गरीब जनतेला योग्य तो न्याय देईल, आणि आरोपींना चांगलाच धडा शिकवेल असे आश्वासन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिले. तर त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी.नगरसेवक विजुभाऊ औटी, महिला आघाडीच्या शिवस...

पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांची बदली

Image
  अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका पोलीस स्टेशनचे सिंघम पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांची अहमदनगर येथे बदली. पारनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ऐवद्य धंद्यावरती, तसेच वाळू गौण खनिज यांसारख्या धंद्यावरती पारनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांचा वचक होता. तर त्यांच्या कायद्याचा धाक हा पारनेर तालुक्यातील जनतेला मोठा होता, नगर जिल्ह्यातील एक नावाजलेले अधिकारी पारनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे बघितले जात. गोरगरीब जनतेवर होणारे अन्याय, यावर त्यांचा मोठा वचक होता. तर पोलीस अधीक्षक राकेश ओला सर यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या पार पडल्या असून पारनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची बदली अहमदनगर जिल्हा येथे करण्यात आली आहे. प्रतिनिधी - रमजान शेख 

गणपतराव हजारे आदर्श सरपंच पुरस्काराने होणार सन्मानित

Image
  संगमनेर तालुक्यातील पानोडी गावचे आदर्श सरपंच गणपतराव हजारे  हे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित होणारा असल्याने पंचक्रोशीच्या वतीने त्यांचे  अभिनंदन तसेच स्वागत करण्यात येत आहे, सरपंच गणपतराव हजारे हे गोरगरिबांचे नेहमी मदतीसाठी सातत्याने पुढे असतात, गावच्या विकासासाठी त्यांचा सर्वात मोठा वाट आहे, तर येणाऱ्या आठ मार्चला सिनेमा अभिनेत्री अलका कुबल यांच्या शुभहस्ते अहमदनगर येथे त्यांना आदर्श पुरस्कार मिळणार असून, गावच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. गणपतराव हजारे हे शिक्षक असून अत्यंत हुशार व्यक्ती महत्त्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात, तर येणाऱ्या अडचणींना ते नेहमी सामोरे जात गोरगरिबांच्या मुला मुलींच्या कामा संदर्भात त्यांचा पाठपुरावा असतो. तर सरपंच गणपतराव हजारे यांना पंचक्रोशी च्या वतीने त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रतिनिधी -  रमजान शेख मांडवे बुद्रुक.