कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

स्व हरीभाऊ व गं.भा.सिताबाई शिंदे यांच्या संसारवेलीवर अरुण व बेंबीताई हे दोन फुले उमलली. अरुणमामा यांचा जन्म (.१/१/१९६८ ) रोजी सर्व सामान्य असणार्या शिंदे कुटूंबात झाला. व त्यानंतर बेबीताईंचा जन्म झाला.घरची परीस्थिती अत्यंत हलाखीची रोज काबाडकष्ट करायचे आणि दोन वेळच्या अन्नापाण्याची सोय करायची. सर्व सुरू होते परंतु त्यात नियतीचा काही गोष्टी मान्य नसल्याने अरुण मामा लहान असताना वडीलांचे निधन झाले.व कुटुंबाची जबाबदारी अंगावर येऊन पडली. त्यामुळे शिक्षणही घेता आले नाही .रोजच शेतीची मजूरीची,नाला बलडींग , विहीरी खोदाई ची अशी कष्टाची कामे करण्यास मामांनी सुरुवात केली.व कुटुंब चालवण्याचे काम केले मामांचा स्वभाव एकदम शांत,संयमी, मितभाषी,होता. व बुद्धी मात्र तल्लख होती. कष्टाच्या कामाबरोबरच इलेक्ट्रिक कामे करण्याचा त्यांचा हातखंडा होता . त्यामुळे ते १९९६/९७ ला घारगांव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा व दिवाबत्ती कर्मचारी म्हणून रुजू झाले. तेंव्हापासून त्यांनी तळमळीने गावची सेवा सुरू केली. स्वभाव शांत ,संयमी,व दुसर्यांचा आदरभाव करणारे असल्याने ते गावात सर्व परीचीत झाले व प्रत्येकाच्याच कुटुंबाचा हिस्सा बनले. तेंव्हापासून अनेक ग्रामसेवक आले, बदलून गेले अनेक सरपंच, सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला परंतू शांत संयमी स्वभावामुळे ते सर्वांनाच हवेहवेसे वाटत होते. त्यांच आयुष्यात कुणाशी भांडण झालेच नाही त्यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटत होते.पुढे अर्चना आहेर या सरपंच म्हणून निवडून आल्या. तर सामाजिक कार्यकर्ते नितीन अण्णा आहेर हेही सक्रिय समाजकारणात उतरले. गावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांना खंबीर साथ मिळाली ती अरुण मामा शिंदे यांची गावची विकासकामे झपाटल्यागत सुरू असताना अरुण मामांनी ही मी एक कर्मचारी आहे.व ठराविक वेळेचेच मला बंधन आहे असे कधीही म्हणाले नाही.रात्रीचा दिवस करुन घारगांव गावच्या स्मशानभूमीची वैकुंठभुमी करण्याचे काम मामांनी केले,तेथे उभी असणारी वृक्ष त्याची साक्ष देत आहेत. त्याच बरोबर पाणीपुरवठा योजना, विविध रस्ते मजबूतीकरण, पथदिवे विविध बांधकामे ही मामांनी स्वतः उभे राहून केली आहेत.व आताही वैकुंठभुमीत महीला ना कपडे बदलण्यासाठी सुरू असलेली चेंजींग रुम व स्वयंपाक गृहाचे काम सुरू होते परंतू त्या कामावर सुट्टी असल्याने असंच एक काम करण्यासाठी मामा गेले असताना काळाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना हिरावून नेले. सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर व ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असंख्य उपचार केले व पुढील उपचारासाठी पुणे या ठिकाणी घेऊन जात असताना मामांनी अखेरचा श्वास घेतला व घारगांवकरांना दुःखाच्या खाईत लोटून ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले. या दुःखाने सगळे घारगांवकर हळहळले व अश्रुंचा बांध फुटुन पाट वाहू लागले. सर्वांनी स्वयंस्फूर्तीने अख्खं गाव बंद ठेवत मामांना अखेरचा निरोप दिला.
मामांनी अख्खी हयातभर पांडुरंगाची सेवा केली त्यांचे कुटुंब वारकरी पंथाचे असून पांडुरंगाचे निस्सिम भक्त आहेत.मामा व त्यांचे कुटुंब रोज सकाळी व संध्याकाळी मंदिरात जाऊन पुजा अर्चा भजन,पुजन,काकडा,हरीपाठ करत असे. तसेच, आळंदी, पंढरपुरच्या दिंडीतून वार्ऱ्या करत असत. व गावातील सप्ताहात सक्रिय सहभाग घेत आलेल्या महाराज मंडळींची सोय आपल्या घरी करत असे.व धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असत.अशया या मामांच्या जाण्याने गेल्या नऊ दिवसांपासून घारगांव गावातील मंदिरांतील सर्व धार्मिक विधी बंद आहेत तसेच बाल गोपाळांनीही हरीपाठ बंद ठेवत मामांना अभुतपुर्व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. अश्या सर्व सामान्य माणसासाठी गावाने अख्खं गाव बंद ठेवून अंत्यविधी केला व आदरपूर्वक आदरांजली वाहिली. म्हणून एकच म्हणावेसे वाटत आहे.
गेले दिगंबर ईश्वर विभुती;
राहील्या त्या स्मृती जगामधी !
मामांचा दशक्रिया विधी उद्या रविवार दिनांक ५/२/२०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता घारगांव वैकुंठधाम मुळानदी तीरी होणार आहे तर ह.भ.प.सखाराम महाराज तागडे ( बीड ) यांची प्रवचन सेवा संपन्न होणार आहे.
मामांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली मामा
ReplyDelete