कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

महाराष्ट्र राज्यात आता आधार कार्ड प्रमाणेच एका कुटुंबासाठी एक नवे स्मार्ट कार्ड असणार आहे. याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नाशिकमध्ये केली आहे.
नाशिक येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना त्यांनी ही माहिती दिली आहे.की मागील आठवड्यात राज्यातील मंत्री आणि सचिवांनी हरियानाचा दौरा केला होता. त्यात त्यांनी हरियाणामध्ये कुटुंबासाठी परिवार प्रपंच पत्रिका नावाने कुटुंब पत्रिका आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही स्मार्ट कार्डची पद्धत महाराष्ट्रात राबविण्याचा विचार करण्यात आला आहे.एक परिवार कार्डबाबत महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांनी थेट नागरिकांमध्ये जाऊन याची माहिती घेतली आहे. आधार कार्डची वैयक्तिक माहिती असते तसेच कुटुंब कार्डमध्ये संपूर्ण कुटुंबाची माहिती आहे. तेच धोरण आता महाराष्ट्रात आणण्याचा विचार सुरू आहे. संपूर्ण कुटुंबाचा डेटा एकत्रित असावा यासाठी ही कुटुंब स्मार्ट कार्डची योजना आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
याबाबत शासनाचा विचार सुरू असून स्थानिक पातळीवरुन कसा प्रतिसाद मिळतो, यासाठी चाचपणी देखील करण्यास लवकरच सुरुवात केली जाणार आहे.
Comments
Post a Comment