कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

राहुल भैया घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप....

 


जाणता राजा युवा प्रतिष्ठान कारेगाव चे अध्यक्ष तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे युवा नेतृत्व राहुल भैया घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाच्या प्रसंगी कारेगाव चे उपसरपंच अशोक भिमाजी पंडित , तंटामुक्ती अध्यक्ष विनायक बाळा घुले, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम बबन घुले, कारे गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष व विद्यमान कारेगाव देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष बाबाजी खरात, माजी उपसरपंच संदीप घुले, युवा कार्यकर्ते महेश गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम ठूबे, विष्णू खरात, अक्षय खरात, ज्येष्ठ नागरिक भास्कर खरात ,कोंडी भाऊ घुले, देवराम घुले ,तसेच कोरेगावचे ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी महिलांनी उपस्थिती दाखवली यावेळी विमल घुले सुंदर बाई लाळगे, चहा बाई आंधळे, पुनम घुले, प्रज्ञा गुंड, यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु