कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर (सतीश फापाळे बोटा) तालुक्यातील पठार भागातील बोटा गाव तालुक्याच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जाणारे गाव आहे.या गावच्या ग्रामपंचायतिच्या विद्यमान सरपंच सौ. सोनालीताई संतोष शेळके यांनी गावातील अंगणवाडी,शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करत आगळा वेगळा वाढदिवस साजरा करत विद्यार्थ्यानं मध्ये रमत आपला वाढदिवस साजरा केला आहे.
लोकनियुक्त सरपंच सौ सोनालीताई संतोष शेळके यांची सन २०२१ मध्ये बोटा गावच्या ग्रामपंचायत सरपंच पदी नियुक्ती झाली. त्यांनी आपले पती माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके यांची साथ मिळवत. त्यांचे मार्गदर्शनाखाली आपल्या नेतृत्वाच्या आणि कर्तुत्वातून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.ग्रामपंचायत बोटा गावचे उपसरपंच पांडूरंग शेळके,तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या विचार विनिमयाने गावच्या विकासाला गती देण्याचे काम केले आहे.
आज १५ ऑक्टोबर हा दिवस लोकनियुक्त सरपंच सौ. सोनालीताई शेळके यांचा वाढदिवस नाथाबाबा विद्यालय बोटा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोटा, बोटा केंद्रातील अंगणवाडी तळपेवाडी ,केळेवाडी ,माळवाडी, वडदरा येथे जाऊन विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून विद्यार्थ्यानं मध्ये रममान होऊन आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेळके,संतोष शेळके सर्व शिक्षक वृंद ,आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment