कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

मुंजाबा ग्रामविकास नवरात्र उत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबविले.
अकोले / तालुक्यातील जाचकवाडी गावात मुंजाबा ग्रामविकास मंडळाने नवरात्र उत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवत कार्यक्रम पार पाडला .गावातील तरुणांनी _महिला नियोजित नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष सतीश फापाळे तसेच समीर जाचक यांनी केले.तर नियोजन रमेश फापाळे,संतोष फापाळे,राहूल रेपाळे, नवनाथ हुलवळे,सागर फापाळे, प्रशांत फापाळे,विनोद फापाळे,अमोल फापाळे, शाम शिंदे ,तरंग जाचक,संतोष शिंदे, तात्याभाऊ हुलवळे,बाळासाहेब कोकाटे,मंगेश शिंदे,मनोहर हुलवळे,नंदा फापाळे,विशाखा रेपाळे ,श्रुती जाचक,सुनीता हुलवळे,शामल शिंगोटे,रवी सहाणे,विकास सहाणे यांनी केले.यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या भाविक भक्तांनी या मंडळाचे तोंड भरून कौतुक केले आहे.
या नवरात्र उत्सवात नऊ दिवस तरुण ,महिला,ग्रामस्थांनी ,भाविक भक्तांनी देवीची नऊ दिवस जागर करत मनोभावे सेवा केली आहे.दसऱ्याच्या दिवशी अलोट भाविक भक्तांच्या जनसमुदाय देवीच्या विसर्जन मिरवणूक कार्यक्रमात सहभागी झाला होता.यावेळी देवीला निरोप देताना अनेक भाविकांचे डोळे पाणावलेले दिसून आले.
Comments
Post a Comment