कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारातील साकुरफाटा परीसरातील हॉटेल वनश्री समोर झालेल्या अपघातात कारचा चक्काचूर झाल्याची घटना सोमवार दिनांक ३ आॅकटोंबर रोजी दुपारी साडे चार वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वानंद जोशी हे त्यांच्या ताब्यातील कार क्रमांक एम एच १५ जी एक्स ५६१६ ही घेऊन पुणेवरुन नाशिकच्या दिशेने सहकुटुंब चालले होते ते सोमवारी दुपारी साडे चार वाजेच्या दरम्यान गुंजाळ वाडी शिवारातील साकुरफाटा परीसरात आले असता पाठीमागुन भरधाव वेगाने आलेल्या टेंपोने हुलं दिली
त्यात जोशी यांनी कार कट पॉइंट मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करत असताना कार नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर गेली त्यात नाशिककडून पुण्याच्या दिशेने चाललेल्या ट्रक क्रमांक एम एच १५ डि के ७६५५ हिच्या समोर कार अचानक आल्याने ट्रक ने कारला जोरदार धडक दिली यात कारचा चक्काचूर झाला.तर कार मधील कल्याणी जोशी व लहान मुलगा जखमी झाले.
घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मनेश शिंदे,योगीराज सोनवणे यांसह आदि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.व जखमींना खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले.तर सदरील अपघातग्रस्त वाहणे टोल नाक्याच्या क्रेनच्या सहाय्याने महामार्गाच्या बाजुला घेऊन वाहतुक व्यवस्था सुरळीत केली. व सदर घटनेची माहिती घारगांव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आदिनाथ गांधले यांना दिली.दरम्यान सदरील अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून प्रवासी बालंबाल बचावले
Comments
Post a Comment