कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

आता तर हद्दच झाली राव.. चक्क शासनाच्या मालमत्तेचीच चोरी झाली आहे आतातरी यांना कोणी आवर घालील काहो.. अशी म्हणण्याची वेळ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव व आंबीखालसा येथील ग्रामस्थांवर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घारगांव व आंबीखालसा दोनही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या केटीवेअरचे ढापेच चोरट्यांनी चोरुन नेले आहेत . त्यामुळे भविष्यात दोनही गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. याबाबत आंबीखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी घारगांव पोलीस ठाण्यात तशी फिर्यादही दिली आहे. त्यात असे म्हणले आहे की,आंबीखालसा गावचे शिवारातील मुळा नदीवरील केटि वेअरचे ढापे २२ ऑक्टोबर रोजीचे सायंकाळी ७ वा नंतर ते २८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ढापे चोरून नेले आहेत अश्या आशयाची फिर्याद दाखल केली आहे.तर याबाबत अज्ञात चोरटयाविरोधात गु र नं ३४८/२०२२ भा द वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करत आहेत.
दरम्यान दिवसेंदिवस पठार भागात चोऱ्यांचे सत्र वाढतच असून यापुर्वीही अनेक शेतकऱ्यांच्या केबल,मोटारी,
घारगांव व आंबीखालसा गावांसाठी मुळा नदिवरील हा केटिवेअर वरदान ठरलेला आहे. दोनही गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामाध्यमातून सुटलेला आहे.मात्र आता नदिला पाणी आल्यानंतर या केटिवेअरचे ढापे काढून ठेवले होते. परंतू चोरट्यांनी हे ढापे चोरुन नेल्याने भविष्यात दोनही गावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे.
नितीन आहेर
(सामाजिक कार्यकर्ते घारगांव)
Comments
Post a Comment