कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावातील बिरोबा मंदिर परीसरात राहणाऱ्यां अंकुश राजू शेळके यांचे चारचाकी वाहन बोलेरो जीप चोरीला गेल्याची घटना बुधवार दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की अंकुश राजू शेळके हे आपल्या कुटुंबासोबत बोटा गावातील बिरोबा मंदिर परीसरात राहत आहेत.व त्यांच्याकडे बोलेरो जीप होती. मंगळवारी रात्री शेळके यांनी जीप घरासमोर उभी करुन जेवन झाल्यानंतर झोपले होते .पहाटे कुटुंबातील व्यक्ती उठून बाहेर आल्यानंतर त्यांना बोलेरो जिप दिसली नाही ही घटना कानोकान जाताच अनेकांनी धाव घेत शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू जीप कोठेच आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी घारगांव पोलीस स्टेशन गाठत आपली व्यथा मांडली.
पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्याच शेजारी राहत असलेला चुलतभाऊ रामभाऊ शेळके यांचीही क्रुझर जीप चोरून नेली आहे.तीचाही अजून शोध लागला नाही तोच रात्री बोलेरो जीप चोरीला गेली आहे . त्यामुळे शेळके यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीच्या आनंदी उत्साही काळातच ही चोरी झाल्याने आनंदावर विरजण पडले असून दिवाळीत आमचे दिवाळे निघाले असल्याचे मत अंकुश शेळके यांनी पठार वार्ता शी बोलतांना व्यक्त केले आहे. व आम्हाला आता डोक्यालाच हात लावण्याची वेळ आली आहे असेही शेळके म्हणाले.
बोटा परीसरातून यापुर्वी अनेक शेतकऱ्यांच्या विहीरींवरील मोटार,केबल, शेती उपयोगी साहित्य, शेतीमाल,दुचाकी घरफोडी अश्या एक ना अनेक घटना घडल्या आहेत. त्यात यशवंत शेळके यांच्या तोडणीला आलेल्या डाळींब फळांची चोरी झाली होती त्यानंतर पंचायत समिती सदस्य संतोष शेळके,पांडू शेळके यांनी आपल्या बुद्धीकौशल्याने सहकाऱ्यांच्या मदतीने आळेफाटा येथील बाजार समितीत चोरट्यांचा शोध लावून घारगांव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतरही आजतागायत चोरट्यांचा सुळसुळाट सुरूच आहे. पंधरा दिवसांत दोन चारचाकी वाहनांचीही चोरी झालेली आहे त्यामुळे घारगांव पोलिसांनी तातडीने चोरट्यांना जेरबंद करावे व बोटा गावाला भयमुक्त करावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके,सरपंच सोनाली ताई शेळके,उपसरपंच पांडू शेळके, यशवंत शेळके,सुनिल कणसे,सुहास वाळुंज म्हतु पाडेकर, म्हतु पानसरे,मुनिर शेख,सचिन काळे, सोसायटीचे चेअरमन सुखदेव शेळके, व्हाईस चेअरमन जिजाभाऊ शेळके,राजेश वाळुंज, प्रकाश शेळके, रज्जाक शेख,सतीष माळी, अंकुश शेळके, रामभाऊ शेळके यांसह आदि ग्रामस्थांनी केली आहे.
Comments
Post a Comment