कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

( राष्ट्रीय छावा संघटनेचा कौतुकास्पद उपक्रम.
संगमनेर /( सतीश फापाळे) तालुक्यातील पठार भागात राष्ट्रीय छावा संघटनेच्या माध्यमातून आदिवासी वस्तींवर जाऊन आदिवासी समाजातील लहानग्या मुलांना दिवाळीचे गोड फराळ वाटप करत त्यांचे सोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
असाच उपक्रम सोमवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी घारगाव परिसरातील आदिवासी वस्तीवर जाऊन लहानग्या मुलांना दिवाळीचे फराळ वाटप करत दिवाळी साजरी केली आहे.यातून आदिवासी समाजातील लहानग्या मुलांना खाऊ मिळाल्याचा आनंद तर गगनाला भिडणारा होता.तर राष्ट्रीय छावा संघटनेचा हा कौतुकास्पद उपक्रम आहे असे यावेळी बोलले जात होते.
तालुक्यातील पठार भागात गेली चार महिन्यांपासून ढगफुटी सदृश्य पावसाने तसेच अतीवृष्ठीने शेतकऱ्यांचे उरले सुरले शेतमाल देखील पाण्यात गेले.त्यात या भागातील आदिवासी बांधव शेतमजुरी करून आपला उदर निर्वाह करतो.शेतीत काही कामच उरले नसल्याने उदर निर्वाहाचा प्रश्न ऐरनिवर असताना दिवाळी कशी साजरी करायची लेकरा बाळांना दिवाळीचे गोड पदार्थ बनवून कसे खाऊ घालायचे.असे अनेक प्रश्न आदिवासी बांधवांपुढे उपस्थित होत आहे.त्यात सरकार देखील आदिवासी समाजाबद्दल उदासीन झाले आहे .अशाच व्यथा आता आदिवासी बांधव व्यक्त करत आहे.आणि राष्ट्रीय छावा संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करत आहे.
यावेळी राष्ट्रीय छावा संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कानवडे, तालुका अध्यक्ष जालिंदर राऊत, संपर्कप्रमुख दिनकर घुले, शहर उपाध्यक्ष उपाध्यक्ष विलास रसाळ, तालुका संघटक सचिन बालोडे, शुभम काळे ,पोपट भारसाकळ अधिक कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव उपस्थित होते
Comments
Post a Comment