कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पठार भागातील युवा नेत्याने केले रास्ता रोको आंदोलन

 


संगमनेर / संगमनेर रणखांब मार्गे राहुरी बस पुर्ववत तातडीने चालू करा अन्यथा विद्यार्थी ग्रामस्थांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुलाबराजे भोसले यांनी संगमनेरचे आगारप्रमुख श्री. पाटील यांना निवेदनाद्वारे दिला होता. परंतु निवेदन देऊनही बस चालू न केल्याने अखेर युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुलाबराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता रणखांब फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.‌ जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हटणार नाही असा एल्गार यावेळी आंदोलन कर्त्यांनी पुकारला होता. जवळपास एक ते दीड तास रास्ता रोको केल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. 

याबाबतची माहिती मिळताच संगमनेर आगार प्रमुख श्री. पाटील यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. तसेच आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली. परंतु आमची मागणी मान्य करा अन्यथा आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असे आंदोलन कर्त्यांनी सांगितले. 

यावेळी आगार प्रमुख पाटील यांनी येत्या १ नोव्हेंबर पासून सदर बससेवा पुर्ववत चालू करू असे आश्वासन दिल्यानंतर अखेर दीड तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले. 

दरम्यान,  संगमनेरहून - चंदनापुरी, रणखांब - म्हैसगाव मार्गे राहुरी बस ही पुर्वी सुरळीत चालू होती. परंतु कोरोना काळापासून ही बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. सदर बसची वेळ संगमनेर येथुन दुपारी ४ वाजता राहुरीकडे सोडण्यात येत होती. तसेच राहुरीकडुन सकाळी साडेआठ वाजता संगमनेर कडे असा रुट होता. त्यामुळे प्रवासी तसेच रणखांब येथे शिकणा-या विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शाळेत येण्या - जाण्यासाठी सोय होत होती. तसेच या रुटवरील कुंभारवाडी, दरेवाडी, शेळकेवाडी येथील ५० ते ६० असे सर्व विदयार्थी या बसने रणखांब येथील विद्यालयात शिकण्यासाठी येतात. तसेच संगमनेर या ठिकाणी प्रवाशांसह विद्यार्थी ये - जा करत होते. परंतु सदर बससेवा बंद झाल्यामुळे सर्व विद्यार्थी व प्रवाशी वर्गाचे प्रचंड हाल होत आहे. तरी तातडीने ही बस सेवा सुरळीत चालू करावी अशी मागणी होती.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ बारवे, उप तालुकाप्रमुख उज्वलाताई गुळवे, कैलास गुळवे, पाटोळे सर, अमोल वाजगे, नवनाथ भोसले, रंजीत ढेरंगे, बाळू झिटे, संतोष शेटे, भाऊराव ढेरंगे, संतोष वनवे, गणेश डोंगरे, गणेश परचंडे, दीपक खेमनर, ज्ञानेश्वर खेमनर, मंत्री खेमनर, डॉ. वर्पे, सुभाष गागरे, राजाबाबू वर्पे, शिवाजी नरवडे, सुभाष ढेंबरे, लहानु सागर, गोरख सागर, आनंदा सागर, जयराम गुळवे, सागर शेजवळ, सतीश मनसुख, शरद वाजगे, भाऊसाहेब मोघे, दत्ता मोघे, विलास मोघे, दीपक मोघे, उल्हास गागरे, नवनाथ गागरे, बाळासाहेब घाडगे यांच्यासह पठारभागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु