कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी


(बोटा- सतीश फापाळे)

         संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारात असणाऱ्या खड्ड्याने  २६ वर्षीय तरुणाचा  बळी घेतल्याची घटना शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसात  वाजेच्या दरम्यान घडली आहे

 याबाबत अधिक माहिती अशी की,पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र खड्ड्यांची साम्राज्य निर्माण झाले आहे.दिवाळी सणानिमित्ताने  पुणेवरून  संगमनेरच्या सावरगाव घुले गावा अंतर्गत असणार्या आमलेवाडी येथे आपल्या गावी चाललेला २६ वर्षीय युवक सागर भाऊसाहेब आमले  (रा आमलेवाडी ता संगमनेर) हा त्याच्या ताब्यातील होंडा कंपनीची दुचाकी  क्रमांक एम एच १७ सी बी ३८२१ वरून बोटा  गावाजवळील ओम साई ड्राइव्हर ढाब्याजवक आला असता रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात गाडी आढळली आणि गाडी घसरली त्यात हा युवक गाडीवरून पडला .त्यात पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाखाली सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या घटनेने बोटा परिसरात खळबळ माजली.या घटनेची माहिती समजताच पोलिस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खासगी रुगणवाहीकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

   


 दरम्यान तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ मोठ खड्डे पडले आहे.या खड्ड्यांमध्ये अनेक अपघात झाले. अनेक गाड्यांचे टायर फुटून छोटे मोठे अपघात झाले. अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहे.परंतु महामार्ग प्रशासन मात्र फक्त टोल वसुली मध्ये व्यस्त असून महामार्गावर टोल वसुली प्रमाणे सुविधा देण्यात कमी पडत आहे.महामार्गावर अनेक अपघात झाले तरी देखील महामार्ग प्रशासनाला अद्याप जाग येत नाही . महामार्गावर अपघात होऊन जाणाऱ्या बळींना जबाबदार कोण ,हा महामार्ग अजून किती जणांचे बळी घेणार आहे.यावर कुणाचे नियंत्रण आहे की नाही.महामार्गावरील खड्डे अपूर्ण कामे याबाबत अनेकदा आंदोलने झाली .आवाज  उठवले गेले परंतु गाढ झोपेचे सोंग घेतलेल्या महामार्ग प्रशासनास कोण जागे करणार असे अनेक प्रश्न आता पठार भागातील नागरिक उपस्थित करू लागले आहे.



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु