कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर / तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील धगाडी बाबा मंदिर परीसरात चालकाचे वाहणावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावरील दुभाजकावर चढून पलटी झाल्याची घटना मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर रोज सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विकास कैलास करंजेकर ( राहणार घारगांव.ता संगमनेर) हा त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच १२ एफ झेड ६०५७ हा घेऊन संगमनेर कडून घारगांवच्या दिशेने जात होता.
मंगळवारी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान जावळे वस्ती परीसरातील धगाडी बाबा मंदिराचे पाठीमागील वळणावर आला असता त्याचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने तो महामार्गावरील मधोमध असणार्या दुभाजकावर चढून पलटी झाला. यात ट्रकचे नुकसान झाले आहे.मात्र केवळ दैव बलवत्तर असल्याने चालक बालंबाल बचावला आहे.
घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलिस हावलदार मनेश शिंदे, योगीराज सोनवणे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली
Comments
Post a Comment