कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

थोरात कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान
संगमनेर / सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर मागील 56 वर्षात यशस्वी वाटचाल करताना थोरात कारखान्याने देश पातळीवर आपला लौकिक निर्माण केला आहे. या उज्वल परंपरेसह ऊस उत्पादक व कामगारांचे हित जपताना या दिवाळीनिमित्त दरवर्षीप्रमाणे कारखान्याच्या वतीने सर्व कामगारांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली याप्रसंगी अध्यक्षस्थानी चेअरमन बाबा ओहोळ हे होते. तर व्यासपीठावर आमदार डॉ सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे ,बाजीराव पा.खेमनर, माधवराव कानवडे ,इंद्रजीत भाऊ थोरात ,डॉ. जयश्रीताई थोरात, उपाध्यक्ष संतोष हासे ,सर्व संचालक व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर हे होते.
थोरात कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम करतांना मागील 56 वर्षात अत्यंत यशस्वी वाटचाल केली असून काटकसरीतून हा कारखाना प्रगतीपथावर आहे. देशपातळीवरचे अनेक पुरस्कार या कारखान्याला मिळालेले आहेत. नवीन कारखान्याच्या उभारणीसह अनेक धोरणात्मक निर्णयामुळे इतरांसाठी मार्गदर्शक असणाऱ्या या कारखान्याने मागील हंगामात 15 लाख 53 हजार मे. टनाचे उच्चांकी गाळप केले आहे. दीपावली निमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रोत्साहन पर 176 रुपये प्रति मे. टन. अनुदान बँकेत जमा करण्यात आले आहे .या अनुदानाचे 14 कोटी रुपये, ठेवीवरील व्याज दोन कोटी रुपये व कर्मचाऱ्यांच्या बोनसचे 10 कोटी रुपये असे एकूण 26 कोटी रुपये कारखान्याच्या वतीने दीपावली निमित्त बाजारात येणार आहेत.
बाळासाहेब थोरात
आमदार/माजी मंत्री
कारखान्याने कामगारांचे हित जोपासताना त्यांचा विमा व विविध योजनांसह दरवर्षीप्रमाणे कर्मचाऱ्यांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे .
यामुळे सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून थोरात कारखाना दूध संघ व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पेमेंट नंतर संगमनेर ची बाजारपेठ फुलणार असल्याने सर्व व्यापारी बांधवांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ...
शहरातील व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
दिपावलीनिमित्त कारखान्याच्या वतीने 176 रुपये प्रति मे. टन प्रोत्साहन पण अनुदानासह कर्मचाऱ्यांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान याचबरोबर अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे शेतकरी व कामगार यांना दीपावली निमित्त वाटप यामुळे जिल्ह्यात सर्वात मोठी असणारी संगमनेरची बाजारपेठ फुलणार असल्याने शहरातील व्यापारी व तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये ही आनंदाचे वातावरण आहे
Comments
Post a Comment