कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा नंतरही पारतंत्र्यात जगण्याची वेळ

 



नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला आहे परंतु त्यानंतरही आमच्यावर पारतंत्र्यात जगण्याची वेळ आली आहे अशी व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर येथील ताई संतोष जाधव या महीलेनी मांडली आहे .


याबाबत अधिक माहिती अशी की अकलापूर या ठिकाणी संतोष जाधव हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत व गावालगत त्यांनी घर बांधलेले आहे.घर बांधून अनेक दिवस होऊनही व महावितरणकडे अनेक वेळा पाठपूरावा करूनही आम्हाला लाईटचे कनेक्शन मिळत नाही. 



आमचे घर व पोल फक्त दोनशे फुटांपर्यंतच अंतर असूनही टाळाटाळ केली जात आहे . टाळाटाळ कश्यामुळे केली जात आहे हे मात्र आम्हाला समजू शकले नाही  असे जाधव म्हणत आहेत.जाधव यांनी विज कनेक्शन मिळवण्यासाठी घारगांव विज वितरणच्या कार्यालयात अर्ज केला होता व वेळोवेळी पाठपुरावा करत आहे,परंतू मला उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे असे जाधव यांचे म्हणणे आहे. 


अनेक वेळेला मागणी करूनही आम्हाला वीज कनेक्शन मिळत नाही आमच्या घराच्या परिसरात रात्रीच्या वेळेस संपूर्ण अंधाराच असतो एक तर आम्ही शेतीत राहत असल्यामुळे  जंगली प्राणी, साप यांची भीती मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आम्हाला इजा  पोहोचू शकते. म्हणून आम्हाला येत्या दिवाळी सणापर्यंत तात्काळ वीज कनेक्शन द्यावे अन्यथा आम्ही महावितरण समोर उपोषण करणार आहे .


  ताई संतोष जाधव





Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु