कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पठार भागात अवैध वाळूचा डंपर पकडला

 



संगमनेर (सतीष फापाळे बोटामहसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण राज्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीला आळा घातला असला तरी संगमनेर तालुक्यातील पठार भागात वाळू तस्करांना मात्र काही फरक पडला नसल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी (दि.१५) सकाळी पावणे सातच्या सुमारास केळेवाडी शिवारात वाळू भरून जात असताना महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडून त्याच्यावर कारवाई केली आहे. संगमनेर तहसीलदारांच्या माध्यमातून वाळू तस्करांवर करडी नजर ठेवण्यासाठी तलाठ्यांना सांगितले आहे. कोणत्याही भागात अवैध वाळू उपसा होणार नाही, याची काळजी घेण्याची आदेश तहसील कार्यालयातून निघाले आहे. परंतु काही वाळू तस्कर ऐकण्याच्या भूमिकेत काही दिसेना. तालुक्यातील अनेक भागात अवैध वाळू उपसा होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

तालुक्यातील पठार भागात केळेवाडी शिवारात अकलापूरहून येणारा वाळूचा डंपर बोट्याच्या दिशेने जात असताना बोटयाचे तलाठी रविंद्र हिरवे यांनी पकडला. विना नंबरचा हा डंपर असून त्याच्या ड्रायव्हरकडे चौकशी केली असता तो डंपर प्रशांत मोरे यांच्या मालकीचा असल्याचे तलाठी यांनी सांगितले. डंपरमध्ये ५ ब्रास वाळू असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तसेच तो डंपर वाळूसह घारगाव पोलीस स्टेशनमध्ये लावला आहे. 



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु