कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर / तालुक्यातील साकुर परिसरातील मांडवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे १५ ऑक्टोंबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला आहे.
स्वच्छ भारत आभियान अंतर्गत निरोगी व आनंददायी जीवनासाठी जागतिक स्तरावर १५ ऑक्टोबर हा दिवस हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस युनिसेफने विकसनशील व गरीब देशांत काम करण्यास सुरवात केली तेव्हा पाणी व स्वच्छतेचे महत्त्व विशद झाले. २००८ मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथे पहिला जागतिक जलसप्ताह आयोजित करण्यात आला. याच ठिकाणी संयुक्त राष्ट्र महासभेने १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यावेळी उपक्रमातील ७० पेक्षा जस्त देश सहभागी झाले होते. आता मात्र बहुतेक देश सहभागी होत आहेत.
जागतिक हात धुवा दिनाचे निमित्ताने मांडवे बु. गावचे सामाजिक कार्यकर्ते अँड.अमित धुळगंड, पत्रकार रमजान शेख, जि. प. प्राथमिक शाळा मांडवे बु. सर्व शिक्षक , विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला आहे.
यावेळी वारंवार होणारे संसर्गजन्य आजार तसेच रोगराई पासून दूर राहण्यासाठी, नेहमीत हात धुणे गरजेचे आहे. आपण जर आपली हाताची स्वच्छता चांगली ठेवली तर, आपल्याला होणारे संसर्गजन्य आजार यांपासून दूर राहू, लहान मुलांकडे सर्व पालकांनी लक्ष देणे हे गरजेचे आहे असं मार्गदर्शन ऍडव्होकेट अमित धुळगंड यांनी केले.
यावेळी विलास कुटे, रईस भाई आतार, नामदेव अष्टेकर, लक्ष्मण धुळगंड यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment