कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर (पठारवार्ता वृत्तसंस्था) : १९ वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील जांबुत येथील जोरी मळ्यात घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पुजा भगवान नरवडे असे मृत तरुणीच नाव आहे. बिबट्याने तरुणीचा गळा पकडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी (दि. १२) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. जांबुत येथील जोरीमळा येथे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पुजा ही काही कामासाठी बाहेर आली. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने पुजावर झडप मारून मानेला पकडून ओट्यावरून तिला शेजारील उसाच्या शेतात 200 फुट अंतरावर ओढत नेले. तिच्या आईने आरडाओरडा केल्यावर लगेचच शेजाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. यावेळी बिबट्याने पुजाला तेथेच सोडून पळ काढला. परंतु बिबट्याने थेट तिच्या मानेला पकडल्याने गंभीर जखमी झालेल्या पुजाचा जागेवरच मृत्यू झाला होता.
जांबुत गावात यापुर्वी बिबट्याने एका बालकाचा व दोन महिन्यापुर्वी एका युवकावर हल्ला करुन ठार केले होते. पुन्हा याच गावात 19 वर्षीय युवतीवर हल्ला करून ठार केलेली ही तिसरी घटना असून जांबुत परीसरासह बेट भागातील नागरीक प्रंचड भयभीत झाले आहे.
Comments
Post a Comment