कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

पठार भागातील पाझर तलाव ओसंडून वाहू लागले
पठार भाग झाला जलमय..
संगमनेर/ तालुक्याच्या पठार भागात गणरायाच्या आगमनापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने परिसरातील पाझर तलाव ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसत आहे.
३१ ऑगस्ट रोजी गणरायांचे आगमन झाले. त्याच दिवशी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तेंव्हापासून दिवसाआड होत असलेल्या मुसळधार पावसामुळे परीसरातील पाझर तलाव, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. आंबीखालसा परीसरात गणपीरबाबा हा लघु पाटबंधारेचा ६२ एम सेप्टिचा पाझर तलाव आहे. हा पाझर तलाव शुक्रवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पुर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे आंबीखालसा,घारगांव ,बोरबन, सराटी आदी गावांच्या लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने ठिकठिकाणी उभ्या पिकांत पाणी साठले आहे. बाजरी, सोयाबीन, वाटाणा, कांदा, मिरची,ऊस अशी विविध पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. अधिक पर्जन्यवृष्टी झाल्यास या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
परतीच्या दमदार पावसाने पाझर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहेत. मात्र, झालेल्या पावसाने ठिकठिकाणी शेतात पाणी साचल्याने शेताचे बांध फुटले असून माती वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे प्रशासनाने सर्व्हे करून पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
सुरेश गाडेकर
(सामाजिक कार्यकर्ते आंबी खालसा)
Comments
Post a Comment