कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

सीडी वर्क पुलाची उंची वाढवावी ; गणपीरदरा ग्रामस्थांची मागणी विद्यार्थ्यांची गैरसोय
संगमनेर / तालुक्यातील आंबी खालसा गावांतर्गत असणाऱ्या गणपीरदरा येथे पावसाळ्यात चिमुकल्यांना शाळेत जाण्यासाठी गैरसोय होत आहे. येथे बांधण्यात आलेल्या सीडी वर्क पुलावरून पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. शाळेत न जाता पुलाच्या अलीकडे एखाद्या शेडमध्ये शाळा भरवली जात असल्याचे चित्र आहे. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आंबी खालसा गावांतर्गत गणपीरदरा लोकवस्ती आहे. येथे गणपीबाबा पाझर तलाव आहे. या पाझर तलावात जवळे बाळेश्वर,वरुडी पठार,सारोळे पठार,डोळासणे,माळेगाव पठार या गावांच्या परिसरात होणाऱ्या पर्जन्यवृष्टीने रहाटीच्या ओढ्याद्वारे पाणी येते. ओढ्याच्या पलीकडे १ ली ते ४ थी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. विद्यार्थी व ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी या ओढ्यावर १५ वर्षांपूर्वी सीडी वर्क पुल बांधण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहतो. त्यामुळे या पुलावरून विद्यार्थी व शिक्षकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. अनेकदा पाण्याचा प्रवाह वाढल्यास शाळेत जाणे शक्य होत नाही. संबधित विभागाने या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
गणपीरदरा रस्त्यासाठी निधी दिला आहे. येथील सीडी वर्क पुलाची पाहणी करून त्यासाठी निधी उपलब्ध करून तेही काम मार्गी लावू.
डॉ. किरण लहामटे
( आमदार अकोले विधानसभा मतदारसंघ)
पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास पाण्याचा प्रवाह वाढतो. त्यामुळे मुलांना पलीकडे शाळेत नेणे शक्य होत नाही. आम्ही अलीकडे वस्तीवरच शाळा भरवतो.
शांता हडवळे ,
(मुख्याध्यापिका )
शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ओढा ओलांडून जावे लागते. पाण्याचा प्रवाह अधिक असल्यास शाळा बंद ठेवावी लागते. या पुलाची उंची वाढवणे गरजेचे आहे.
बाळासाहेब ढोले
( सरपंच आंबीखालसा )
Comments
Post a Comment