कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पोषण आहार सप्ताह संपन्न

 पारनेर/ तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वतीने बुधवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी पोषण आहार सप्ताह  साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.प्रियांकाताई खिलारी तर प्रमुख पाहुणे डॉ.सौ.भाग्यश्री दातीर ग्रामसेविका सौ.मोहिनी तरवडे ह्या होत्या .

 या कार्यक्रमांमध्ये स्त्री जन्माचे स्वागत सानवी निलेश ढूमणे श्राव्या अनिल कोठुळे  विठ्ठल सूर्यवंशी तसेच ओटी भरण सौ.जानवी संदीप गायकवाड यांचे कार्यक्रम घेतले अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका सुजाता वाकचौरे  यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर उपस्थित पाहुण्यांचे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .


अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी मी सदैव उभी राहील येणाऱ्या आगामी काळात येणाऱ्या अडचणीसाठी मी तुमच्यासोबत उभी असेल

प्रियंका खिलारी

(महिला आघाडी प्रमुख पारनेर तालुका)


तर यावेळी शोभा हिरे, जयश्री भिंगारकर ,सुशीला गोरडे ,विजया झावरे ,सुनीता झावरे ,बेबी आल्हाट ,सुनंदा थोपटे, सुनिता भालेकर, वसुधा खेडकर, रुबाबी शेख मनीषा गांधी ,मंगल कटारिया यांबरोबर  परिसरातील  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु