कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पेटीट विद्यालयात विद्यार्थी बनले शिक्षक

   महाविद्यालयाच्या प्राचार्यापासून ते विविध विषयांना शिकविण्यापर्यंत सर्वच जबाबदारी सर डी एम पेटीट कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चोखपणे बजावत विद्यार्थी झाले शिक्षक हे शिक्षक शिक्षक दिनाच्या दिवशी दाखवून देत आपणही विद्यार्थ्यांना शिकवू शकतो हेच या विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे

    

   संगमनेर शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर डीएम पेटीट महाविद्यालया मध्ये शिक्षकदिनाचे औचित्य साधून महाविद्या लयाच्या प्राचार्य पदापासून ते सर्व विषयाचे शिक्षकांपर्यंतची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत विद्यार्थी शिक्षकांना नेमून दिलेल्या विष याची घरून तयारी करून आले आणि  आपल्याच वर्गमित्रांना उत्तम प्रकारे शिकवण्याचे काम करून दाखवीत आपण सुद्धा भविष्यात एक उत्तम प्रकारचा शिक्षक होऊ शकतो हे त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्याला शिकवत कृतीतूनच दाखवून दिले आहे 

    यावेळी दैनिक पुढारी चे तालुका प्रतिनिधी गोरक्ष नेहे व महाविद्यालयाचे इन्चार्ज गुलाब गायकवाड विद्यार्थी प्राचार्य  श्रवण भोसले ,पर्यवेक्षक मोहम्मद तांबोळी , इन्चार्ज प्रगती विघे उपस्थित यांच्या हस्ते सरस्वती आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधा कृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी हर्षल जाधव  प्रगती भोसले  या विद्यार्थ्यांनी वर्गात विद्यार्थ्यांना शिकविताना आलेला अनु भव आपल्या मनोगतातून व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु प्रतीक्षा भोसले हिने केले , सूत्रसंचालन  कु .कल्याणी पर्बत  कोमल बिडकर तनुजा कोकणे यांनी केले तर  आभार  कुसिद्धी नाईकवाडी हिने मानले  या वेळी विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या गुरुवर्यांचा पुष्पगुच्छ आणि पेन देऊन सन्मान केला तर विद्यार्थी शिक्षकांचा सन्मान प्रमुख पाहुणे गोरक्ष नेहे व महाविद्यालयाचे इन्चार्ज गुलाब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला              

मोबाइलचे आकर्षण लहानांपासून थोरांपर्यंत सर्वानाच आहे  परंतु त्याचा अतिरेक झाला तर  मोबाईल मधून बाहेर पडणे अवघड आहे मात्र शहरातील सर डीएम पेटीटविद्यालयाच्या प्रशासनाने महाविद्यालय व विद्यालयाच्या परिसरात मोबाईल वापरण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आल्याचा ठराव पालक विद्यार्थी मेळाव्यात करून एक आगळा वेगळा पायंडा पाडला आहे.

गोरक्ष नेहे

(उपाध्यक्ष सगमनेर पत्रकार मंच)




Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु