कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर मध्ये मतदान ओळखपत्र व आधार कार्ड जोडणी शिबिराचे नियोजन
चला जबाबदारी पार पाडूया माझ्या मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडुया...
मा. भारत निवडणूक आयोगामार्फत ऑगस्ट २०२२ पासून मतदार यादी शुद्धीकरण आणि मतदान कार्डला आधार क्रमांक जोडणी करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्या अनुषंगाने आधार जोडणी शिबिराचे आयोजन करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तरी २१७ संगमनेर विधानसभा मतदार संघामध्ये याबाबत मा.मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी गावोगावी व मतदान केंद्र स्तरावर शिबिराचे नियोजन करण्याबाबत बैठक पार पडली असून शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २१७ संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. कि या दिवशी आपल्या आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मतदारांचे मतदान कार्ड हे आधार क्रमांकाला लिंक करण्याचे काम करावे. या द्वारे सर्व मतदारांना देखील आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना याकामी सहकार्य करावे.
तसेच २१७ संगमनेर मतदार संघातील दिनांक 1 ऑगस्ट २०२२ ते ८/०९/२०२२ पर्यंत २७६१३८ मतदारांपैकी १५२५७५ इतके मतदारांचे एकूण 55.97 टक्के आधार जोडणीचे कामकाज पूर्ण झालेले असून राज्यात २९७ संगमनेर मतदारसंघाचे काम आघाडीवर असून मा. मुख्य निवडणूक अधिकारी श्री. श्रीकांत देशपांडे यांनी मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी व सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे अभिनंदन केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment