कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, आपणही निसर्गाचं काहीतरी देणं लागतो आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील दुर्गम भागातील भोजदरी येथील सामाजिक कार्यकर्ता तथा वृक्षमित्र विशाल उगले या युवकाने भोजदरी येथील माळरानावर भोजामाता युवामंच व आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने रवीवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी वृक्षारोपण केले.
विशाल उगले हे आपल्या कुटुंबासोबत भोजदरी येथे राहतात.व त्यांना अगदि लहानपणापासूनच निसर्ग सौंदर्याची आवड आहे. व ते राहत असलेले भोजदरी हे गाव अगदि उंच डोंगर रांगांवर वसलेले असून तेथे फक्त पावसाळ्यातच निसर्ग सौंदर्याची अनुभूती घेता येते.बाकी इतर ऋतूत अगदी दुष्काळी परीस्थिती राहत असते. त्यामुळे माझ्या गावच्या प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी व आपले गाव सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, असे उगले यांना कायमच वाटतं असते. तर मते यांनी आपल्या गावचा परीसर हिरवागार व्हावा म्हणून व इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणून गावापासून जवळच असणाऱ्या माळरानावर पिंपळ,उंबर, सिताफळ, अश्या २०० वृक्षांचे रोपण केले आहे.व त्याच्या संगोपनाचीही जबाबदारी घेतली आहे.
सध्या शेती व्यवसाय अस्मानी व सुलतानी संकटांमुळे तोट्यात चालला आहे त्यामुळे अनेक शेतकरी बांधव हे उत्पादन वाढीसाठी अनेक रासायनिक खते,औषधे,किटकनाशकांचा सर्रास बेसूमार वारेमाप वापर करत असतात. त्यात बेसूमार वृक्षतोड, उत्खनन तसेच प्रदुषण वाढू लागल्याने निसर्गाचा समतोल ढळत चालला असून दिवसेंदिवस अतीवृष्टी, दुष्काळ, महापूर अश्या प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने माणसाचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे. तेंव्हा सजिव आणि पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी वृक्षारोपण आणि संगोपन केले पाहीजेत. तरच शुद्ध हवा भरपूर ऑक्सीजन मिळेल.
तसेच निसर्गातील प्राण्यांना व पक्षांना अन्न व आश्रयासाठी झाडांशिवाय पर्याय नाही. त्याकरीता प्रत्येक माणसाने जेथे जागा असेल तेथे वृक्षारोपण करून संवर्धन केले पाहिजे.अथवा आपआपल्या घरासमोर, शेताच्या बांधावर वृक्षारोपण केले पाहिजे, असे आवाहन. भोजामाता युवामंचचे विशाल उगले, सुमित लांडगे, सचिन मते, संकेत वाळुंज ,संकेत मते, स्वप्नील मते , शरद वाळुंज ,आमित मते ,स्वप्नील हांडे ग्रामसेवक अशोक बलसाने आदिंनी केले आहे.
निसर्ग हे आपले सर्वस्व असून आपण त्याच्या जतन व संवर्धनासाठी प्रत्येक गावातील नागरीकांनी प्रयत्न करणे गरजेचे असून गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकांच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी शुभेच्छा वृक्ष, गावातील ज्या तरुणांचे विवाह होतील त्यासाठी शुभमंगल वृक्ष, कौतुकसोहळ्यासाठी आनंद वृक्ष, गावातील कन्यांचे विवाह होतात त्या कारणासाठी माहेरची झाडी आणि मृत व्यक्तीच्या स्मृती जपण्यासाठी स्मृती वृक्ष लावण्यात यावेत असे वाटते आणि असे केल्यास नक्कीच प्रत्येक गांव हरीत, सुजलाम, सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.
विशाल भाऊसाहेब उगले
( उपाध्यक्ष भोजामाता नवतरुण युवामंच भोजदरी )
Comments
Post a Comment