कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पी एम किसान ई केवायसीला मुदतवाढ

 शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

लाभ घेण्याचे तहसीलदार अमोल निकम यांचे शेतकऱ्यांना आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. अद्याप संगमनेर तालुक्यात २१ हजार ७९८ शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही. या शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत केवायसी करून घ्यावी, अन्यथा बारावा हप्ता बँकेत जमा होणार नाही, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार उर्वरित लाभार्थी यांनी दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ पर्यंत E-KYC करणेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती तहसिलदार यांनी दिली आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षाकाठी एकूण ६ हजार रुपये निधी दिला जात आहे. प्रत्येक चार महिन्याला २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केला जात आहे.

काही लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खात्यावरील असलेले नाव तसेच आधार कार्डवर असलेले नाव यामध्ये फरक आढळून येतो. त्यामुळे या योजनेचा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होताना काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक लाभार्थी शेतकयास e-KYC प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले. ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ई केवायसीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार उर्वरित लाभार्थी यांनी दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ पर्यंत E-KYC केली नाही. तर पुढील हप्ते मिळणार नाही. E-KYC करण्यासाठी लाभार्थी यांनी नजीकचे सेतू केंद्र, महा ई सेवा केंद्र, CSC सेंटर मध्ये आधार कार्ड व मोबाइल घेऊन जावे.


केवायसी शंभर टक्के व्हावी, यासाठी केंद्र सरकारने ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत दिली होती. मात्र, या प्रक्रियेस शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रक्रियेस ३१ मे, ३१ जुलै, १५ ऑगस्ट व ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली होती, तरीही अद्याप संगमनेर तालुक्यातील २१,७९८ शेतकऱ्यांची ई-केवायसी केलेली नाही. या लाभार्थ्यांना ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसिलदार श्री अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी श्री. प्रविण गोसावी व गटविकास अधिकारी श्री. अनिल नागणे यांनी केले आहे.




पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आले आहे. ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना  पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही, याची सर्व लाभार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी


तरी सर्व लाभार्थी यांनी www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल ऍप मध्ये OTP द्वारे मोफत e -KYC करता येईल(सोबत लिंक दिली आहे) किंवा नजिकच्या CSC केंद्राशी संपर्क साधुन आपली e-KYC तात्काळ करुन घ्यावी*

अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक,ग्रामसेवक किंवा तलाठी यांचेशी संपर्क करावा

सोबत e-KYC करण्यासाठी लिंक दिलेली आहे

https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx

अमोल निकम 

तहसीलदार संगमनेर



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु