कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर / तालुक्याच्या पठार भागातील दुर्गम भागातील भोजदरी गावात अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरुच असून मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी चोरट्यांनी बंद घरे लक्ष करत चोरी केल्याची घटना घडली आहे
याबाबत अधिक माहिती अशी,भोजदरी गावातील अंबादास सावळेराम डोंगरे, व बन्सी गोपाळ वाळुंज यांची बंद घरे लक्ष करत चोरट्यांनी चोरी केली आहे. अंबादास डोंगरे हे मुंबई येथे वास्तव्यास असून त्यांची शेती भोजदरी येथे आहे व राहण्यासाठी शेतात घर आहे.तर बन्सी वाळुंज हे गणपती पाहण्यासाठी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दोनही घरांच्या दरवाज्याचे कोंडे तोडले व आतमध्ये प्रवेश केला.
घरातील कपाट , पेट्या, डब्यांसह घरातील सर्व सामानाची उचकापाचक करुन चोरी करत पोबारा केला. दरम्यान आजुबाजुच्या नागरीकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी डोंगरे व वाळुंज यांना याबाबतची माहिती दिली.मात्र हे दोन्ही घरवाले मुंबईला असल्याने काय व किती चोरी झाली आहे हे मात्र समजू शकले नाही.
दरम्यान मागील काही महिन्यांपासून भोजदरी गावात अनेक घरांमध्ये चोऱ्या झाल्या असून शेतकऱ्यांच्या मोटारी,केबली, शाळेतील कॉम्प्युटर, मंदिरातील दानपेटी अश्या विविध ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे घारगांव पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी पोलिस पाटील गणपत हांडे, चेअरमन शिवाजी वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते भास्कर भारती,पोपट वाळुंज,शरद तपासे, सुनिल लोहटे,शिवाजी उगले , दिलिप पिंपळे, नंदू कदम, फक्कड हांडे, सुनिल लांडगे,कुंडलिक हांडे, शिवाजी हांडे,बबन मते, शांताराम डोंगरे,दिगंबर हांडे , सुमित लांडगे यांसह आदि ग्रामस्थांनी केली आहे.
Comments
Post a Comment