कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

भरपावसात आ.डॉ सुधीर तांबे यांनी शिक्षकासोबत साधला संवाद..




संगमनेर / शिक्षक बांधवांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक भारती व अन्य संघटनांच्या वतीने औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक सन्मान रॅलीत आमदार डॉ सुधीर तांबे सहभागी झाले आणि सभेच्या ठिकाणी शिक्षक बंधू - भगिनींशी संवाद साधला.

यावेळी वरुण राजानेही हजेरी लावली. पण आपल्या मागण्यांसाठी आग्रही असलेले शिक्षक बांधव मागे हटले नाहीत. त्यांचा हा उत्साह बघून आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी देखील भर पावसात त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी, सरकारी शाळा टिकविण्यासाठी आणि आपल्या न्याय्य हक्कांसाठी शिक्षक बांधवांनी दाखवलेली ही एकजूट नक्कीच कौतुकास्पद आहे आणि ती परिणामकारक ठरेल, असा विश्वास आहे.
मुख्यालयी राहण्याची अट रद्द करा किंवा शासकीय निवासस्थाने बांधून द्या, अशैक्षणिक कामे देऊ नका, सरकारी शाळा भौतिकदृष्ट्या सुसज्ज करा, अन्यायकारक धोरणे रद्द करा, सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या, विद्यार्थीनींचा उपस्थिती भत्ता वाढवा, शिक्षकांची व शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे भरा, सर्व शिक्षक/कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, वस्ती शाळा शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ द्या अशा मागण्या या रॅलीच्या माध्यमातून सरकारसमोर मांडण्यात आल्या आहेत. यावेळी या मागण्यांचे निवेदन आयुक्तांचे प्रतिनिधी तहसीलदार श्री.अरुण पावटे यांच्याकडे सुपूर्द केले.

या रॅलीला राज्यभरातील विविध संघटनांचे शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. आ. अंबादासजी दानवे, शिक्षण भारतीचे संस्थापक मा. आ. कपिलजी पाटील, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार मा. विक्रमजी काळे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. सतिशजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


 



Comments

Popular posts from this blog

शालेय विद्यार्थीनी बेपत्ता

कळमजाई धबधब्याखाली बुडून युवकाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजवाहक तारेच्या धक्क्याने मृत्यु