कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

संगमनेर/ तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथे स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त गणेश बहुजन विदया प्रसारक संस्थेचे,श्री.नाथाबाबा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बोटा येथे ७ वी ते ९ वी गटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे शनिवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठ वाजता आयोजन करण्यात आले आहे.तरी या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य महेंद्र जठार व पर्यवेक्षक फाफाळे सर यांनी केले आहे.
ही स्पर्धा जुन्नर, अकोले, संगमनेर, पारनेर तालुक्यातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली असून एका शाळेतील फक्त दोन विद्यार्थ्यांना यात सहभाग नोंदविला येईल.प्रथम तीन क्रमांकास रोख स्वरूपात बक्षीस, आकर्षक सर्टिफिकेट व वस्तू स्वरुपात बक्षीस दिले जाईल.तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना आकर्षक सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.तर प्रत्येक स्पर्धकास ३ ते ५ मिनीटांचा वेळ असेल.
या स्पर्धेसाठी नावनोंदणी ही ३ ऑगस्ट पर्यंत करावी. भाषण स्पर्धेतील नाव नोंदणी ही फोन करून आणि विद्यार्थ्यांची नावे मुख्याध्यापकाची सही शाळेच्या लेटर पॅडवर फोटो काढून अथवा पि,डी,एफ करुन पाठवावीत.
तर या स्पर्धेकरता
१) माझा भारत
२)माझा आवडता क्रांतिकारक
३) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
या विषयावर भाषण सादर करता येणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १३०१ रुपये
द्वितीय क्रमांकास ११११रुपये
तृतीय क्रमांकास १००१ रुपये
चतुर्थ क्रमांकास ५५५ रुपये रोख स्वरूपात बक्षीस दिले जातील तर प्रथम पाच क्रमांकास ट्रॉफी, कंपास,पाच फुलसकेप वह्या ,पेन आदि साहित्य भेट दिले जाणार आहे. स्पर्धेचे ठिकाण नाथाबाबा विदयालय बोटा हे आहे.तर स्पर्धेत भाग घेण्यासाठी
अशोकराव साळवे सर (९९७५७४३८०१)
सचिन फटांगरे सर(९८२२८४०९६३)
आनंदराव मधे सर (९९२१५५१७३१)
शंकरराव पानसरे सर(९५५२४९३५७१)
यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नाथाबाबा विदयालय व संस्थेच्या संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment