Posts

Showing posts from October, 2022

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

पठार भागात चक्क शासनाच्या मालमत्तेची झाली चोरी..

Image
आता तर हद्दच झाली राव. . चक्क शासनाच्या मालमत्तेचीच चोरी झाली आहे आतातरी यांना कोणी आवर घालील काहो. . अशी म्हणण्याची वेळ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव व आंबीखालसा येथील ग्रामस्थांवर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घारगांव व आंबीखालसा दोनही गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या केटीवेअरचे  ढापेच चोरट्यांनी चोरुन नेले आहेत . त्यामुळे भविष्यात दोनही गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. याबाबत आंबीखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले यांनी घारगांव पोलीस ठाण्यात तशी फिर्यादही दिली आहे. त्यात असे म्हणले आहे की,आंबीखालसा गावचे शिवारातील मुळा नदीवरील केटि वेअरचे ढापे २२ ऑक्टोबर रोजीचे सायंकाळी ७ वा नंतर ते २८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ढापे चोरून नेले आहेत अश्या आशयाची फिर्याद दाखल केली आहे.तर याबाबत अज्ञात चोरटयाविरोधात गु र नं ३४८/२०२२ भा द वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर  पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करत आहेत. दरम्यान दिवसेंदिवस पठा...

ऐन सणासुदीच्या काळात आले मोठे संकट

Image
  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावातील बिरोबा मंदिर परीसरात राहणाऱ्यां अंकुश राजू शेळके यांचे चारचाकी वाहन बोलेरो जीप चोरीला गेल्याची घटना बुधवार दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अंकुश राजू शेळके हे आपल्या कुटुंबासोबत बोटा गावातील बिरोबा मंदिर परीसरात राहत आहेत.व त्यांच्याकडे  बोलेरो जीप होती. मंगळवारी रात्री शेळके यांनी जीप घरासमोर उभी करुन जेवन झाल्यानंतर झोपले होते .पहाटे कुटुंबातील व्यक्ती उठून बाहेर आल्यानंतर त्यांना बोलेरो जिप दिसली नाही ही घटना कानोकान जाताच अनेकांनी धाव घेत शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू जीप कोठेच आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी घारगांव पोलीस स्टेशन गाठत आपली व्यथा मांडली. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्याच शेजारी राहत असलेला चुलतभाऊ रामभाऊ शेळके यांचीही क्रुझर जीप चोरून नेली आहे.तीचाही अजून शोध लागला नाही तोच रात्री बोलेरो जीप चोरीला गेली आहे . त्यामुळे शेळके यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन सणासुदीच्या आनंदी उत्साही काळातच ही चोरी झाल्याने आनंदावर विरजण पडले असून दिवाळीत आमचे दिवाळे न...

दिवाळीचे फराळ देऊन आदिवासी बांधवांच्या लहानग्यांची केली दिवाळी गोड

Image
  (       राष्ट्रीय  छावा संघटनेचा कौतुकास्पद उपक्रम. संगमनेर /( सतीश फापाळे) तालुक्यातील पठार भागात राष्ट्रीय छावा संघटनेच्या माध्यमातून आदिवासी वस्तींवर जाऊन आदिवासी समाजातील लहानग्या मुलांना दिवाळीचे गोड फराळ वाटप करत त्यांचे सोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. असाच उपक्रम सोमवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी घारगाव परिसरातील आदिवासी वस्तीवर जाऊन लहानग्या मुलांना दिवाळीचे फराळ वाटप करत दिवाळी साजरी केली आहे.यातून आदिवासी समाजातील लहानग्या मुलांना खाऊ मिळाल्याचा आनंद तर गगनाला भिडणारा होता.तर राष्ट्रीय छावा संघटनेचा हा कौतुकास्पद उपक्रम आहे असे यावेळी बोलले जात होते.       तालुक्यातील पठार भागात गेली चार महिन्यांपासून ढगफुटी सदृश्य पावसाने तसेच अतीवृष्ठीने शेतकऱ्यांचे उरले सुरले शेतमाल देखील  पाण्यात गेले.त्यात या भागातील आदिवासी बांधव शेतमजुरी करून आपला उदर निर्वाह करतो.शेतीत काही कामच उरले नसल्याने उदर निर्वाहाचा प्रश्न ऐरनिवर असताना दिवाळी कशी साजरी करायची लेकरा बाळांना दिवाळीचे गोड पदार्थ बनवून कसे खाऊ घालायचे.असे अनेक ...