Posts

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

कळस बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात!

Image
  कळस बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास सुरुवात! अकोले : ( भाऊसाहेब वाकचौरे )तालुक्याच्या पूर्वेला प्रवरेच्या तीरावर वसलेल्या परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कळस बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास आज प्रारंभ झाला. सकाळी पांडुरंगाची पूजा व ध्वजारोहण करून या पावन सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऋषिपंचमी ते वराह जयंती २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, मृदंगाचार्य व गायनाचार्य सहभागी होणार आहेत. या सप्ताहात हरिभक्त परायण अरुण महाराज शिर्के, प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, विनोदाचार्य पांडुरंग महाराज उगले, परभणी वारकरी भूषण अर्जुन महाराज मोटे पळशीकर, वारकरी रत्न ज्ञानेश्वर महाराज जळकेकर (जळगाव), विनोदाचार्य नरेंद्र महाराज गुरव (मालेगाव), कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे (गेवराई) आदी मान्यवर कीर्तनकार आपले कीर्तन सादर करणार आहेत. तसेच संस्कृतीताई वाकचौरे (कळस), कुंडलिक मह...

अकलापूरात पारंपरिक जल्लोषात बैलपोळा साजरा!

Image
  अकलापूरात पारंपरिक जल्लोषात बैलपोळा! शेतकऱ्यांचा लाडक्या सर्जा-राजाची सजूनधजून गावातून काढली मिरवणूक  नवनाथ गाडेकर/घारगांव संगमनेर तालुक्यातील पठार भागात बैलपोळा उत्साहात साजरा होत असून, यंदा अकलापूर ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला. गावातील शेतकरी आपल्या सर्जा-राजाला नटवून थटवून एकत्र जमले होते. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बैलाला आकर्षक गोंडे, पायातील घुंगरांचा पट्टा, पाठीवर रंगीबेरंगी झुल, पितळी घंटा आणि प्लास्टिकच्या कवड्यांच्या माळांनी सजवलं होतं. सजलेल्या बैलांच्या थाटामाटाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. वाद्यांच्या गजरात मिरवणूक, गुलालाची उधळण गावभर काढलेल्या भव्य मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर, सनई-ताशांचा निनाद आणि लेझीमच्या तालावर ग्रामस्थांचा उत्साह उंचावला होता. गुलालाची उधळण करत गावकऱ्यांनी या जल्लोषात भर घातली. व्हिडिओ  मिरवणूक हनुमान मंदिरापर्यंत गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला गुडघ्यावर बसून हनुमानरायांचं दर्शन घडवलं. त्यानंतर अकलापूर गावचे ग्रामदैवत स्वयंभू दत्त प्रभूंच्या दर्शनासाठी बैलांना नेण्यात ...

जनसेवेचा आणि यशस्वी व्यावसायिकतेचा संगम – बाळूशेठ गाडेकर

Image
 🌹  ज्याच्या मनात समाज, आणि कृतीत प्रगती – तोच खरा यशस्वी !”  🌹 ✨ जनसेवेचा आणि यशस्वी व्यावसायिकतेचा संगम – बाळूशेठ गाडेकर ✨ नवनाथ गाडेकर - घारगांव लक्ष्मी उद्योग समूहाचे यशस्वी संचालक,  व्यापार क्षेत्रातील एक नावाजलेले उद्योजक, आणि सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात सदैव मोलाचे योगदान देणारे बाळासाहेब सहादू गाडेकर उर्फ बाळूशेठ  यांचा आज जन्मदिवस त्यांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेतला तर, तो जिद्द, परिश्रम, दूरदृष्टी आणि समाजसेवेच्या अनोख्या मिलाफाने सजलेला दिसतो. 🌱 बोरबनहून व्यावसायिक शिखरापर्यंत बोरबन गावात जन्मलेले बाळूशेठ साधेपणातून आले, पण मोठं स्वप्न घेऊन जगले. प्रारंभीच्या संघर्षातून त्यांनी कधीच पाऊल मागे घेतले नाही. व्यापारी क्षेत्रातील चढ-उतारांना सामोरे जात त्यांनी दत्तूशेठच्या सोबतीने  व्यापारात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या आणि दत्तूशेठ गडगे यांच्या एकत्रित प्रयत्नांतून  “लक्ष्मी उद्योग समूह” आज नावाजलेला आणि विश्वासार्ह ब्रँड बनला आहे. 💛  समाजकार्यात नेहमी पुढे व्यवसायाच्या जोडीला समाजसेवेची ओढ हीच त्यांची...

श्री संत सावता महाराज पतसंस्थेच्या नवीन वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा

Image
  घारगाव  ( नवनाथ गाडेकर ) बोरबन-घारगाव परिसरात समाजाभिमुख आर्थिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या श्री संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. या संस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन व भव्य स्थलांतर सोहळा गुरुवार, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता उत्साहात संपन्न होणार आहे. नवीन वास्तूत नवसंजीवनी, नवऊर्जेसह सामाजिक आणि आध्यात्मिक एकात्मतेचा मिलाफ घडवून आणणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला जगद्‌गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर (नाशिक) यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. महाराजांचे सायं. ५ ते ७ या वेळेत कीर्तन सेवा होणार असून, त्यांना श्री रामदास स्वामी वारकरी गुरुकुल, आणे यांची कीर्तनसाथ लाभणार आहे. त्यानंतर सायं. ७ वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख कीर्तनकारांचा सन्माननीय सहभाग  लाभणार आहे  या शुभक्षणी आध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित कीर्तनकारांची उपस्थिती कार्यक्रमास विशेष भाविकतेची जोड देणार आहे. यामध्ये,ह.भ.प. तुळशिराम महाराज सरकटे जुन्नर,ह.भ.प. गुरुवर्य भागवताचार्य अशोक महाराज...

भारतीय सैन्यदलाचे विजयी तिरंगा रॅली काढून वाढवले मनोबल

Image
  भारतीय सैन्यदलाचे विजयी तिरंगा रॅली काढून  वाढवले मनोबल संगमनेरात भारतीय सैन्यदलाच्या समर्थनार्थ  विजयी तिरंगा रॅली संगमनेर प्रतिनिधी       जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी२७ निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला होता. त्या दहशत वादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कर  ,वायुदल आणि नौदल या तिन्ही दलाच्या सैनिकांना प्रोत्साहन दिले म्हणून त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर देत चांगलाच धडा शिकवला. म्हणून भारतीय तीनही सैन्यदलाच्या  समर्थनार्थ,त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच भारतीय नागरिकां च्या सुरक्षेसाठी शहराच्या विविध भागा तून विजयी तिरंगा मोटारसायकल रॅली काढून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.      संगमनेर शहरातील नगरपालिकेच्या जवळील लालबहादूर शास्त्री चौकामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंगदल  महायुतीचे सर्व कार्यकर्ते तसेच  देशप्रेमी नागरिक  एकत्र आले. आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दहशतवादी हल्ल्यामध्ये ठार झ...

साकूरातून दुचाकीची चोरी

Image
  साकूरातून दुचाकीची चोरी  साकुर/प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील साकूर येथील बस स्थानक परीसरात उभी असलेल्या दुचाकीची चोरी झाली आहे.ही घटना मंगळवार दिनांक १३ मे रोजी घडली आहे.        ( सुलतान शेख यांची चोरी गेलेली हिच ती दुचाकी ) सुलतान हिरामण शेख हे शिंदोडी येथील रहिवासी असून ते १३ मे रोजी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच १७ बी बी ०१७९ हिच्यावरून साकूर येथे गेले होते व तीथे बसस्थानक परिसरात त्यांनी दुचाकी उभी करुन दुसऱ्या वाहनातून ओतूर याठीकाणी कामानिमित्त गेले होते. काम आटोपल्यावर पुन्हा ते आले असता त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्यांनी घारगांव पोलीस ठाणे गाठत दुचाकी चोरी झाली असल्याची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान घारगांव पोलिसांनी दुचाकी चोरीकडे लक्ष देऊन दुचाकी चोरटे जेरबंद करावे अशी मागणी दुचाकीस्वरांमधून होऊ लागली आहे