Posts

Showing posts from August, 2024

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचा जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा

Image
  संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशनचा जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात साजरा   जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांनी चंदनापुरी येथील विठ्ठल विसावा या मंदिरपरिसरात स्वच्छता मोहीम राबवून  उत्साहात साजरा केला . या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून ओंकार राठी तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वच्छता दूत आदित्य घाटगे व राजेश शहा  यांना निमंत्रित केले होते मंचावर ज्येष्ठ छायाचित्रकार काशिनाथ गोसावी  राम भागवत व शांताराम कोल्हे हे उपस्थित होते        प्रथम सकाळी 9 ते 11 या वेळेत विठ्ठल विसावा या मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली त्या कामी  यशस्वी फाऊंडेशन चे आदित्य घाटके व त्यांची कन्या यशस्वी घाटके यांनी अनमोल मदत केली नंतर फोटो, व्हिडिओ कॅमेरा चे पूजन करून पुष्पहार अर्पण करून पाहुणे व अध्यक्षांच्या मनोगताने कार्यक्रम संपन्न झाला   याप्रसंगी  ज्येष्ठ छायाचित्रकार निसर्ग देशमुख, कैलास खोले ,सतीश जम्बुकर, दीपक घुले, राम भागवत, राजू गुळवे, किरण डोंगरे, गोपाल बोराडे, संतोष शिंदे, प्रवीण थोरात, सुनील वाया...

पत्रकार सुभाष भालेराव राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

Image
  पत्रकार सुभाष भालेराव राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित   स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय धार्मिक  क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो यावर्षीचा आदर्श राज्यस्तरीय  पत्रकारिता पुरस्कार  संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील दिव्य मराठीचे प्रतिनिधी  सुभाष भालेराव यांना आदर्श पत्रकारिता  पुरस्कार देऊन  सन्मानित  करण्यात आले  अहिल्यानगर मधील माऊली सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते    कार्यक्रमाचे अध्यक्ष यादवराव पावशे ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन पत्रकार सुभाष भालेराव यांचा  रविवारी (दि.18) रोजी  सन्मान करण्यात आला.    कृषी, शिक्षण, सहकार, राजकारण अशा संगमनेर तालुक्यातील ग्रामीण पत्रकारितेद्वारे न्याय देऊन अनेकांचे प्रश्न सोडवलेले आहेत  त्यांचे विविध क्षेत्रातील  अभ्यासपूर्ण लिखान असते. त्यांनी पत्रकारितेचा प्रवा...