Posts

Showing posts from July, 2024

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अक्षय ढोकरे

Image
  संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अक्षय ढोकरे  संगमनेर ( नवनाथ गाडेकर ) तालुक्याच्या पठार भागातील कोठे खुर्द गावाअंतर्गत असलेल्या खांडगेदरा येथील रहीवासी व बोटा गटाचे मा. जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांचे विश्वासू सहकारी अक्षय ढोकरे यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.       अक्षय ढोकरे हे समाजकार्य करत असतानाच अनेक वर्षांपासून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तसेच बोटा गटाचे मा. जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून काम करत आहेत . सामाजिक काम करत असतानाच दांडग्या जनसंपर्काच्या आधारावर त्यांनी युवक वर्गाचे मोठ्या प्रमाणात संघटन केले आहे. कॉंग्रेस पक्षाचा सर्व समावेशक विचार ते युवाशक्ती पर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत.  या सर्वांची दखल घेऊन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात  यांनी ढोकरे यांची उपाध्यक्षपदी निवड करत मोठी जबाबदारी सोपवली आहे.तसेच संगमनेर तालुक्यात विविध पदांवर इतर पदाधिकाऱ्यांच्या देखील निवडी करण्यात आल्या आहेत.या निवडीबद्दल...

चलो अकोले! चलो अकोले स्व.अशोकराव भांगरे जयंती महोत्सव व भव्य शेतकरी मेळावा

Image
  चलो अकोले! चलो अकोले स्व.अशोकराव भांगरे जयंती महोत्सव व भव्य शेतकरी मेळावा अकोले विधानसभा मतदारसंघाच्या परीवर्तनाचे शिल्पकार, संघर्षयोद्धा , लोकनेते स्व.अशोकराव भांगरे यांचा ६१ वा जयंती महोत्सव सोहळा व भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी १० वा अकोले (बाजारतळ) ता.अकोले.जि.अ.नगर येथे करण्यात आले आहे. अशी माहिती  संगमनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार)पक्षाचे मा.सरचिटनीस सुशील आभाळे यांनी दिली. तर या कार्यक्रमासाठी मा.श्री.खा.शरदचंद्रजी पवार, आ.जयंतराव पाटील, आ.बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहेत.तर या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अकोले विधानसभा ,यशवंत युथ फौंडेशन अकोले यांच्या वतीने करण्यात आले आहे.

घारगाव बोरबन सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र निवृत्ती आहेर यांची निवड

Image
  घारगाव बोरबन सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र निवृत्ती आहेर यांची निवड सविस्तर व्हिडिओ पहा  यावेळी ग्रामस्थ नातेवाईक व मित्रपरिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहत सन्मान केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 

वाढदिवस युवा समाजसेवक अष्टपैलूव्यक्तिमत्वाचा...

Image
  वाढदिवस युवा समाजसेवक अष्टपैलूव्यक्तिमत्वाचा...   स्वराज्य संकल्पक राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ, शहाजीराजे भोसले अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, हिंदुस्थानातील थोर क्रांतिकारक, स्वराज्याच्या जडण घडणीतील प्रत्येक मावळा, आईबाबांच्या विचार आणि संसकारांच्या माध्यमातून घडलेला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एक आदर्श युवा समाजसेवक म्हणजेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र सबघटनेचे संस्थापक/प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील.  शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवश्री राहुल ढेंबरे पाटील करत आहेत. गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे व गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे झालेले नुकसान, विजेसंदर्भातील नविन विज कनेक्शन, सौर क्रुषी पंप योजना, ट्रांसफार्मर संदर्भातील अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे काम, ग्रामीण भागातील बहुतांश गावातील नेटवर्क...