Posts

Showing posts from July, 2025

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

श्री संत सावता महाराज पतसंस्थेच्या नवीन वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा

Image
  घारगाव  ( नवनाथ गाडेकर ) बोरबन-घारगाव परिसरात समाजाभिमुख आर्थिक कार्यात अग्रस्थानी असलेल्या श्री संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. या संस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन व भव्य स्थलांतर सोहळा गुरुवार, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता उत्साहात संपन्न होणार आहे. नवीन वास्तूत नवसंजीवनी, नवऊर्जेसह सामाजिक आणि आध्यात्मिक एकात्मतेचा मिलाफ घडवून आणणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला जगद्‌गुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती ह.भ.प. डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर (नाशिक) यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. महाराजांचे सायं. ५ ते ७ या वेळेत कीर्तन सेवा होणार असून, त्यांना श्री रामदास स्वामी वारकरी गुरुकुल, आणे यांची कीर्तनसाथ लाभणार आहे. त्यानंतर सायं. ७ वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख कीर्तनकारांचा सन्माननीय सहभाग  लाभणार आहे  या शुभक्षणी आध्यात्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित कीर्तनकारांची उपस्थिती कार्यक्रमास विशेष भाविकतेची जोड देणार आहे. यामध्ये,ह.भ.प. तुळशिराम महाराज सरकटे जुन्नर,ह.भ.प. गुरुवर्य भागवताचार्य अशोक महाराज...