Posts

Showing posts from May, 2024

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमीत्त बिरेवाडी येथे भव्य बालसंस्कार / रक्तदान शिबीर संपन्न..

Image
  स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमीत्त बिरेवाडी येथे भव्य बालसंस्कार / रक्तदान शिबीर संपन्न... संगमनेर :- स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमीत्त शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटना तसेच बिरेवाडी ग्रामस्थांकडून दरवर्षी भव्य बालसंस्कार शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते .  बिरेवाडी पंचक्रोशीतील बालक जास्तीत जास्त संख्येने या बालसंस्कार शिबिरात सहभागी होत असतात. वर्षानुवर्षे बालसंस्कार शिबिरात सहभागी होणाऱ्या बालकांची संख्या वाढत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार शिबिर म्हणजे बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व विकास, समाजातील एक जबाबदार व्यक्तिमत्व घडण्यास तसेच सर्वांगीण विकासासाठी एक पर्वणीच ठरत आहे. शिवनेरी रक्तपेढी यांच्या सहकार्याने बिरेवाडी परिसरातील बहुसंख्य युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्वश्रेष्ठ दान- रक्तदान शिबिरातही सक्रिय सहभाग नोंदवत रक्तदान केले. बालसंस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना नाश्ता व भोजन व्यवस्था ज्ञानदेव मोठ्याभाऊ ढेंबरे (माऊली उद्योग समूह) तसेच दिनकर देवराम ढेंबरे...