Posts

Showing posts from May, 2025

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

भारतीय सैन्यदलाचे विजयी तिरंगा रॅली काढून वाढवले मनोबल

Image
  भारतीय सैन्यदलाचे विजयी तिरंगा रॅली काढून  वाढवले मनोबल संगमनेरात भारतीय सैन्यदलाच्या समर्थनार्थ  विजयी तिरंगा रॅली संगमनेर प्रतिनिधी       जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी२७ निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला होता. त्या दहशत वादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कर  ,वायुदल आणि नौदल या तिन्ही दलाच्या सैनिकांना प्रोत्साहन दिले म्हणून त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर देत चांगलाच धडा शिकवला. म्हणून भारतीय तीनही सैन्यदलाच्या  समर्थनार्थ,त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच भारतीय नागरिकां च्या सुरक्षेसाठी शहराच्या विविध भागा तून विजयी तिरंगा मोटारसायकल रॅली काढून त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.      संगमनेर शहरातील नगरपालिकेच्या जवळील लालबहादूर शास्त्री चौकामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंगदल  महायुतीचे सर्व कार्यकर्ते तसेच  देशप्रेमी नागरिक  एकत्र आले. आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दहशतवादी हल्ल्यामध्ये ठार झ...

साकूरातून दुचाकीची चोरी

Image
  साकूरातून दुचाकीची चोरी  साकुर/प्रतिनिधी  संगमनेर तालुक्यातील साकूर येथील बस स्थानक परीसरात उभी असलेल्या दुचाकीची चोरी झाली आहे.ही घटना मंगळवार दिनांक १३ मे रोजी घडली आहे.        ( सुलतान शेख यांची चोरी गेलेली हिच ती दुचाकी ) सुलतान हिरामण शेख हे शिंदोडी येथील रहिवासी असून ते १३ मे रोजी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच १७ बी बी ०१७९ हिच्यावरून साकूर येथे गेले होते व तीथे बसस्थानक परिसरात त्यांनी दुचाकी उभी करुन दुसऱ्या वाहनातून ओतूर याठीकाणी कामानिमित्त गेले होते. काम आटोपल्यावर पुन्हा ते आले असता त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्यांनी घारगांव पोलीस ठाणे गाठत दुचाकी चोरी झाली असल्याची तक्रार दाखल केली आहे. दरम्यान घारगांव पोलिसांनी दुचाकी चोरीकडे लक्ष देऊन दुचाकी चोरटे जेरबंद करावे अशी मागणी दुचाकीस्वरांमधून होऊ लागली आहे