Posts

Showing posts from January, 2025

कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज

Image
  कलियुगात हरिनाम जपाला महत्व आहे : शिर्के महाराज  अकोले ( भाऊसाहेब वाकचौरे) तीर्थक्षेत्राच भ्रमण व स्नान करताना हरिनाम जपण्याला महत्व आहे नाहीतर सर्व यात्रा व्यर्थ आहे. कलियुगात हरिनाम जपल्याने मानवाचा कुळासह पूर्वजांचा सुद्धा उद्धार होतो. असे मत कळस वारकरी भूषण ह.भ.प. अरुण महाराज शिर्के यांनी व्यक्त केले.        अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या कळस बु येथे प. पू. सुभाष पुरी महाराज यांचे कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाची किर्तन सेवेत त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं तरिं व्यर्थ ॥१॥      या ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाच्या अभंगावर निरूपण  करताना शिर्के महाराज बोलत होते.  ऋषिपंचमी ते वामन जयंती निमित्ताने २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या पवित्र पर्वकाळात आयोजित किर्तन सेवा शिर्के महाराज यांची होती. वारकरी परंपरेनुसार सप्ताहाची प्रथम दिवसाची किर्तन सेवा ही नामपर प्रकरणातील असावी हा सांप्रदायिक दंडक त्याचे पालन करुन हा अभंग निवडला होता.      शिर्के महाराज यांनी ...

घारगावच्या पुणेकर मित्र मंडळाचे स्नेह संमेलन, मेळावा संपन्न

Image
  घारगावच्या पुणेकर मित्र मंडळाची नवकार्यकारणी स्थापन !गाव विकासाचा ध्यास. स्नेह संमेलन मेळावा संपन्न. नवनाथ गाडेकर  संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील पुणेकर मित्र मंडळाच्या वतीने रविवार दि. ५ जानेवारी रोजी सायं.६ ते १० वाजताच्या दरम्यान स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.हे स्नेह संमेलन मराठी अस्मितेचे माहेरघर पुणे येथील मोशीतील हॉटेल ८४ ईस्ट प्राधिकरण या ठिकाणी मोठ्या थाटामाटात पार पडले.        या स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश आहेर (सर) यांची निवड करण्यात आली.त्यांनी पुणेकर मित्र मंडळाचे स्थापनेचा ईतिहास व उद्देश सर्वांपुढे मांडला.या कार्यक्रमाचे नगरसेवक संजय आहेर यांनी प्रास्ताविक करत सर्वांचे स्वागत केले.योगेश आहेर यांनी अहवाल वाचन केले.नितीन आहेर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.या वेळी माजी अध्यक्ष नरहरी आहेर, ऊर्मिला आवटे व हांडे साहेब यांनी आपले विचार मांडले.भालचंद्र मुळे साहेब यांनी वृक्ष संवर्धन व त्यांचे मानवी जीवनात असणारे महत्त्व विषद केले. दरम्यानच्या काळात पुढील पर्वासाठी संचालक मंडळाची बहुमताने निवड करण्यात आली आह...